Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election

Vidhan Parishad Election Result : मुंबई पदवीधर मतदारसंघातून (Mumbai Graduate Constituency Election) अनिल परब यांचा 26 हजार 26 मतांनी विजय झाला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब (Anil Parab) आणि भाजपचे किरण शेलार (Kiran Shelar) यांच्यात लढत होती. मतदारांनी भाजपला नाकारलं असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं.

अनिल परबांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रमेश किर हे उभे होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola