Anil Parab : पदवीधर निवडणूक ठाकरे गटातून अनिल परब मैदानात, आज भरणार अर्ज ABP Majha
मुंबई : लोकसभेची निवडणूक संपताच विधानपरिषदेच्या अनेक जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा आता विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे व(Vidhan Parishad Election 2024) ळवलेला पाहायला मिळतोय. त्याचसोबत दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे 9 जागा रिक्त आहेत. तर राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे या सर्वच जागांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली पाहायला मिळतेय.
राज्यपाल नियुक्त 12 जागांचा प्रश्न कायम
यंदाच वर्ष खऱ्या अर्थाने निवडणुकांचं वर्ष मानलं जातंय. लोकसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरु असताना आता विधानपरिषदेची तयारी राजकीय पक्षानी सुरु केली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागा रिक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 9 जागा आणि राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त आहे. त्यामुळे एकुण 78 जागांचं संख्याबळ 51 वरती येणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील अनेक गणितं बदलण्याची शक्यता आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे विलास पोतनीस, लोक भारतीचे कपिल पाटील, भाजपचे निरंजन डावखरे आणि अपक्ष किशोर दराडे हे निवृत्त होणार आहेत. जुलैमध्येही अनेक आमदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
या जागांच्या सोबतच राज्यपाल नियुक्त 12 जागांचा ही प्रश्न समोर आला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या बारा नावांना मंजुरी दिलेले नव्हती. त्यामुळे अद्यापपर्यंत यावर निर्णय होऊ शकला नाही. न्यायालयातही हे प्रकरण आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे.