Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी नागपुरातील घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Continues below advertisement
Anil Deshmukh Bail: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल (Arthur Road Jail) ते सिद्धिविनायक मंदिर ( Siddhivinayak Temple) दरम्यान बाईक रॅली (bike rally) काढण्यात येणार आहे.
Continues below advertisement