Anil Deshmukh Arrested : अनिल देशमुख ED कार्यालयाकडून न्यायालयाकडे रवाना, मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक
Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर ईडीनं अटक केली आहे. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.
Tags :
Anil Deshmukh Anil Deshmukh Ed Anil Deshmukh Arrested Anil Deshmukh News Anil Deshmukh Arrested Today Anil Deshmukh News Today Ed Arrests Anil Deshmukh Anil Deshmukh Court Anil Deshmukh Taken To Court