Anil Deshmukh Released : अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, अजित पवार, जयंत पाटलांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष
Continues below advertisement
Anil Deshmukh Released : अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, अजित पवार, जयंत पाटलांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष
अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे अखेर आज अनिल देशमुखांची तुरुंगाबाहेर आले आहेत.
Continues below advertisement