Anil Deshmukh Case | अनिल देशमुख चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत दोन व्यक्ती असून त्यापैकी एक वकील असल्याचं कळतं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआय आज अनिल देशमुख यांची चौकशी करणार आहेत. 15 दिवसात प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.