ईडीच्या समन्सनंतर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी Anil Deshmukh दिल्लीला रवाना
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबई आणि नागपुरातील घरांच्या झाडाझडतीनंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. त्यानंतर या प्रकरणाबाबत कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाल्याचं समजतं. त्यामुळे अनिल देशमुख आता सुप्रीम कोर्टात जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.