Anil Deshmukh Arrested: अनिल देशमुख यांनी सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात आल्याचा मुहूर्त साधला?
अनिल देशमुख यांच्या ईडीसमोर जाण्याच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू झालीय. सचिन वाझे यांचा ताबा एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे आल्यानंतरच देशमुख यांनी ईडीसमोर जाण्याचा मुहूर्त कसा साधला, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. पोलीस आपण सांगू ते वाझेंकडून वदवून घेतील असं देशमुख यांना वाटलं असावं असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. किंवा संपत्तीवर टाच येईल या भीतीमुळे देशमुखांनी ईडीसमोर जाण्याचं ठरवलं असावं असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
Tags :
Maharashtra Mumbai Ncp ED Anil Deshmukh Money Laundering Case Sachin Vaze Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh Arrested Anil Deshmukh And Sachin Vaze