Angarki Sankashti Chaturthi: निर्बंध शिथिलतेनंतरची पहिली अंगारकी,सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी
आज अंगारकी संकष्टी. या निमित्तानं आजच्या दिवसाची सुरुवात करुयात गणपतीबाप्पाच्या दर्शनानं..... कोरोना काळात कुलुपबंद असलेली मंदिरं आता उघडली आहेत आणि त्यानंतर प्रथमच आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त गणेशभक्त बाप्पाचं दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे निर्बंध शिथिल झाल्यानं आज अंगारकी संकष्टीला मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर रात्रभर खुलं होतं. याशिवाय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यातल्या ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.
Tags :
Siddhi Vinayak Ganapati Mandir Shri Siddhi Vinayak Ganapati Mandir Angarki Sankashti Angarki Sankashti Chaturthi 2021 Sankashti Chaturthi 2021 Angarki Sankashti Importance