Andheri East Bye Elections : अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; 3 नोव्हेंबरला मतदान, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी

Andheri East Bypoll Elections 2022 : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Andheri Bypoll Elections) जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola