Kangana Ranaut : तर कंगना रनौतविरोधात अटक वॉरंट काढणार... मुंबईतील अंधेरी कोर्टाचा संताप
Continues below advertisement
मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात गैरहजर राहीली. त्यामुळे आता 20 सप्टेंबरला होणा-या पुढील सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्यानावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली आहे. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तसेच दंडाधिकारी न्यायालयाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही दिलेला आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणं बंधनकारक होतं. या सुनावणीला जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी आणि जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही न्यायालयात हजेरी लावली होती.
Continues below advertisement