Kangana Ranaut : जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगना रनौतला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Continues below advertisement

कंगना रनौतला अंधेरी दंडाधिकारी कोर्टात 1 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यासाठी हे समन्स जारी करण्यात आलं आहे. कंगना जर या सुनावणीसाठी गैरहजर राहीली तर तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी होऊ शकतं. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी कंगनानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र यावर सुनावणी घेण्यास नकार देत सोमवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या खंडपीठानं कंगनाला योग्य कोर्टापुढे दाद मागण्याचे निर्देश दिलेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार या याचिकेवर एकलपीठासमोर (सिंगल बेंच) सुनावणी होणे अपेक्षित असल्याचं जावेद अख्तर यांच्यावतीनं बाजू मांडणाऱ्या अँड. वृंदा ग्रोव्हर यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्याची दखल घेत हायकोर्टानं कंगनाला योग्य न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिलेत.

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगान रणौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगानं काही दिवसांपूर्वी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र या खटल्याच्या वैधतेला आव्हान देत कंगनानं दाखल केलेली याचिका फेटाळत दिंडोशी सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानं आता कंगनापुढे हायकोर्टात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram