Anandrao Adsul यांना अटक होण्याची शक्यता; कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला ABP Majha

Continues below advertisement

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे. कारण मुंबई सत्र न्यायालयानं आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. तसंच पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा देण्याची मागणीही न्यायालयानं अमान्य केलीय. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंद अडसुळांविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर, ईडीनं त्यांची चौकशी सुरु केली आहे.. आनंदराव अडसूळ सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना, सुमारे 900 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी 27 सप्टेंबरला अडसूळ यांच्या मुंबईतील राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकून चौकशी केली.  मात्र अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडली. दरम्यान ईडीच्या या कारवाईच्या विरोधात अडसूळ यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram