Amit Shah गणपती दर्शनाच्या दौऱ्यावर, शाहांच्या मुंबई दौऱ्यात 'मिशन मुंबई' ची सुरुवात होणार?
मुंबईत राजकीय काल्यानंतर आता गणेशोत्सवातही राजकीय रंग पाहायला मिळतायत. गणेशोत्सवात ५ सप्टेंबररोजी मुंबईचा दौरा करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बाप्पाच्या दर्शनानंतर मिशन मुंबईचा शुभारंभ करणार आहेत. या दौऱ्यात गणपतींचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत. मुंबई महापालिकेचा किल्ला सर करण्यासाठी शाह भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत. मुंबई महापालिकेत गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. आणि यावेळी ती उलथवून टाकण्यासाठी भाजपनं सारी शक्ती पणाला लावली आहे. त्यादृष्टीनं शाह यांच्या या मुंबई दौऱ्याकडे पाहिलं जातंय.....