Amit Jayswal : ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला ABP Majha

शिवसेनेचे श्रीरंग-वृंदावन परिसरातील विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या जयस्वाल यांना उपचारार्थ तातडीने ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अमित जयस्वाल यांच्यावरील हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात जयस्वाल यांच्यावर वार झाले आहेत. जयस्वाल यांच्यावरील हल्ल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर आज जीवघेणा हल्ला करण्यात आला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola