Ajit Pawar-Sudhir Mungantiwar | मुनगंटीवार म्हणाले आम्ही चुकलो, अजित पवार म्हणतात, 'चुकीला माफी नाही'!

अर्थसंकल्पीय भाषणाच्या चर्चेला उत्तर देताना 'दगडी चाळ' चित्रपटातील 'चुकीला माफी नाही' हा डायलॉग विधानसभेत घुमला. अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेला हा डायलॉग विधानसभेत घुमण्याचं कारण ठरलं ते ज्योतिरादित्य शिंदे यांचं सीमोल्लंघन. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरील कमळ फुलायला लागलं. हाच धागा पकडून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola