Ajit Pawar : प्रभादेवीचा राडा ते एकनाथ शिंदेंची पैठण सभा, अजित पवारांनी डागली तोफ

Continues below advertisement

Ajit Pawar On CM Eknath Shinde : राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (LOP Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सरकारी कर्मचाऱ्यांना परिपत्रक काढून बोलावण्यात आल्यावरुन त्यांनी टीका केली. त्यांनी म्हटलं की,  मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सर्व अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका यांना खुशाल बैठकीसाठी बोलावलं आहे. असं राज्यांत कधी झालं नव्हतं. परिपत्रक काढून त्यांना बोलावण्यात आलं आहे. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी या महिला सभेला आल्या तर मग लहान मुलांचं काय? त्यांना कोण सांभाळणार? आता मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली असेल तर अवघड आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram