Ajit Pawar on Sanjay Raut ED Arrest : केंद्रीय यंत्रणांना चौकशीचा अधिकार, तपासाबाबत राऊतच बोलू शकतील

Continues below advertisement

Ajit Pawar : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी  ED चं पथक दाखल झालं आहे. गेल्या तीन तासाहून अधिक वेळ झालं  ED च्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरु आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांची ईडीकडून पुन्हा पुन्हा का चौकशी केली जात आहे, याबाबत राऊत साहेबच बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. देशातील कोणत्याही नागरिकाची चौकशी करण्याचा अधिकार त्या यंत्रणांना असल्याचे पवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram