Ajit Pawar: पवारांना दिलेला अल्टीमेटम मान्य न झाल्याने अजित पवार नाराज !
Ajit Pawar: पवारांना दिलेला अल्टीमेटम मान्य न झाल्याने अजित पवार नाराज ! आज राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) फुटली असून काही दिवसांपासून असलेली धुसपूस समोर येताना पाहायला मिळत आहे. यानुसार अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्याचबरोबर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे.