Ajit Pawar On Vedanta Foxconn : वेदांता प्रकल्प टक्केवारीमुळे गेला नाही, अजित पवारांचा पलटवार
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प टक्केवारीमुळे गेला असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना अजित पवार यांनी स्पष्टच उत्तर दिलंय. टक्केवारी मागितली हा आरोप धादांत खोटा आहे. आरोप करत असाल तर तो सिद्धही करून दाखवा, असं आव्हान अजित पवार यांनी दिलंय. शिंदे सरकारच्या चुकांमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचंही ते म्हणाले.