Ajit Pawar Full Speech : विरोधी पक्षनेतेपदावरुन मुक्त करा, अजितदादांचं भाषण टाळ्या-शिट्ट्यांनी गाजलं

Continues below advertisement

NCP Ajit Pawar : मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आता मला संघटनेत कोणतही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी संघटनेतील कोणतेही पद देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक आहे का? अशा चर्चेला सुरुवात झाली आहे.  पक्षातील कोणतेही पद द्या, असे म्हणत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला आहे का ? असा सवालही उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांची संघटनेतील कोणतेही पद देण्याची पक्षाकडे मागणी केली. संघटनेत कोणतेही पद द्या, पदाला न्याय देईन, असे अजित पवार म्हणाले. जयंत पाटील मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी 3 वर्षांनंतर पद बदलण्याची पक्षाचा घटनेत तरतूद आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram