Ajit Pawar Cabinet Expansion : अजित पवारांना अर्थ खात्यासह सहकार खातंही मिळण्याची शक्यता

अखेर अजित पवारांना अर्थ खाते देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळालीय. इतकंच नाही तर अर्थखात्यासोबत सहकार खातंही अजित पवारांना मिळाल्याचं कळतंय. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थखातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळतेय. याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे आता अजित पवारांच्या अर्थखात्याला विरोध दर्शवणाऱ्या शिंदे गटाची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola