Ajay Devgan | अभिनेता अजय देवगणची कार रोखली; शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याची मागणी

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दिंडोशी पोलिसांनी अटक केलेल्या या व्यक्तीचं नाव राजदीपसिंग आहे. मुंबईतल्या आपल्या घरातून गोरेगावच्या फिल्मसिटीत शूटिंगसाठी जात असताना अजय देवगणच्या कारसमोर अचानक राजदीपसिंग आला. “दिल्लीत इतके दिवस झाले शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांचे तू समर्थन का केले नाही? त्यांच्या समर्थनार्थ तू ट्विट का केले नाही? असं म्हणत जवळपास १५ मिनिटे त्यानं अजयची कार रोखून धरली होती. हा प्रकार घडत असताना तिथं बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळं पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निदर्शनं करणाऱ्या राजदीप सिंगला ताब्यात घेऊन, अजय देवगणची कार गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत सोडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola