EXCLUSIVE VIDEO:नागपूरहून टेकऑफ घेताचं Air Ambulanceचं चाक निखळलं,मुंबईत विमानतळावर सुरक्षित लँडिंग

Continues below advertisement

मुंबई : नागपूरवरुन हैदरबादला निघालेल्या एका चार्टर विमानाचं (एअर अ‍ॅम्ब्युलन्स) पुढचं चाक रनवेवरच वेगळं झालं. त्यानंतर त्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आलं. माहितीनुसार, एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या जेटसर्व एविएशनकडून ऑपरेट केल्या जाणाऱ्या या सी-90 एयरक्राफ्ट VT-JIL चं पुढचं चाक नागपूरच्या रनवे 32 वर उड्डाण करताना विमानापासून वेगळं झालं होतं. समोरचे चाक निखळल्यानंतरही सुरक्षितपणे मुंबईत विमानतळावर उतरवण्यात यश आले आहे. 

या मेडिकल फ्लाईटमध्ये 2 क्रू मेंबर, एक डॉक्टर आणि एका रुग्णासह पाच लोक होते. मुंबई एअरपोर्टवर या नॉन शेड्यूल फ्लाईटचं लॅंडिंग करत उतरवलं गेलं. सर्व लोकांना मुंबईमध्ये आपत्कालीन लॅंडिंगनंतर सुरक्षित बाहेर काढलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram