Rakhi Sawant : सहा तास चौकशी केल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतची सुटका

अभिनेत्री राखी सावंतला आज आंबोली पोलिसांनी आज ताब्यात घेऊन सहा तासाच्या चौकशीनंतर सोडून दिलं.  अभिनेत्री शर्लिन चोप्रानं आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखीवर केलाय. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय...मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं होतं..   याप्रकरणी आज पोलिसांनी राखीला ताब्यात घेऊन चौकशी केली..  राखीने पोलिसांना चौकशीत सहकार्य केलंय..सहा तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राखीला सोडून दिले आहे. राखी सावंत आंबोली पोलीस स्टेशनमधून हात जोडून बाहेर निघाली.  दरम्यान पोलिसांनी राखीला सोडलं असून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आलाय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola