Amey Ghole to enter Shinde Group : आदित्य ठाकरेंचे विश्वासू अमेय घोले शिंदे गटात जाणार?
आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले हे शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यात घोलेंच्या फेसबुक पोस्टनं चर्चांना आणखी उधाण आलंय. अमेय घोले हे आदित्य ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. २०१७ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीत अमेय घोलेंना आदित्य ठाकरेंच्या शिफारशीनंच उमेदवारी मिळाली होती. अमेय घोले हे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत.