Aaditya Thackeray on Mumbai Trans Harbour Link Toll : प्रायश्चित म्हणून MTHL चा टोल माफ करावा
मुंबईमधून जेमतेम तासाभरात अलिबागामध्ये दाखल होण्याची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत असाल, तर थोडं थांबा. आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठीचा एकेरी टोलचा प्रस्तावित दर एकदा ऐका. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी तब्बल ३५० रुपये एकेरी टोल आकारण्याचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारसमोर आहे. बसला ना धक्का. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. कारण १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचं उद्घाटन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिवडी ते न्हावाशेवा हा सागरी सेतू तब्बल २३ किलोमीटरचा असून, देशातला तो सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूविषयी राज्यातल्या नागरिकांमध्ये कुतूहलाची भावना आहेच, पण ३५० रुपये टोलच्या प्रस्तावानं त्या कुतूहलाला आश्चर्याचीही जोड मिळाली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी लावण्यात येणाऱ्या टोलवरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला चॅलेंज दिलंय.. वेदांता फॉक्सकॉन, टेस्ला यांचं प्रायश्चित म्हणून एमटीएचएलचा टोल माफ करा असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय.