Shefali Jariwala Death | अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती
अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंधेरीतील रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. शेफाली जरीवाला यांचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी झाला होता. त्यांनी अनेक अल्बम आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. बिग बॉस १३ मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी शेफाली यांच्या पती पराग त्यागी यांच्यासह आणखी चौघांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.