कोरोना चाचणीचे वाढीव दर आकारणाऱ्या मुंबईतील लॅबवर कारवाई होणार, माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा परिणाम
सुरवातीच्या काळात 4500 रुपये देऊन करण्यात येणाऱ्या कोव्हिड टेस्टचे दर कमी होत होत 780 रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे नक्कीच अनेकांना यामुळे दिलासा मिळालाय. मात्र, प्रत्यक्षात छोट्या मोठ्या लॅबमध्ये खरंच 780 रुपयात टेस्ट होतेय का? राज्य सरकारच्या या नियमांचं पालन केलं जातंय का? मुंबईतील पॅथोलॉजी लॅबच्या स्टिंग ऑपरेशनची महापौरांकडून दखल घेण्यात आली. कोविड टेस्टसाठी वाढीव दर आकारणाऱ्या लॅबची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.