Mumbai Jaipur Passenger: आरोपी चेतन सिंहची कसून चौकशी सुरु, ट्रेनमधील सहकाऱ्यांचा जबाब नोंदवणं सुरु
Continues below advertisement
मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय. जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहनं गोळीबार केला. पहाटे पाच वाजून २३ मिनिटांनी वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली. आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. बोरिवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू आहे. चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
Continues below advertisement