MHADA EXAM : म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी ABVP आक्रमक, जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शनं

Mhada Recruitment Paper Leak protest : म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता राजकारण तापू लागले आहे. भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटना  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, अभाविपच्या या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.

म्हाडातील भरतीसाठी रविवारी परीक्षा होणार होती. मात्र, ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही परीक्षा रद्द होत असल्याची माहिती ट्वीटरवरून दिली. अचानकपणे रद्द झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना होती. परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरून अनेक विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola