
ABP Majha Impact : 'एबीपी माझा'च्या ऑपरेशन लुटारुवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया म्हणाले..
Continues below advertisement
एबीपी माझाच्या ऑपरेशन लुटारुनंतर आता भाजप नेता आशिष शेलार यांनी मोठा आरोप केला आहे. आशिष शेलार यांनी 'एबीपी माझा'चं अभिनंदन करत क्लिनअप मार्शलच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. एबीपी माझाने क्लिन अप मार्शलचा पर्दाफाश केल्यानंतर आशिष शेलारने या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे. आशिष शेलार यांनी आरोप केला की, क्लिन अप मार्शल फक्त कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची पहिली पायरी आहे. हा पैसा कोणा कोणापर्यंत पोहचतो याची चौकशी झाली पाहिजे आणि यावर श्वेतपत्रिका काढण्याची त्यांनी मागणी केली आहे.
Continues below advertisement