Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
ABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
abp majha web team
Updated at:
13 May 2024 06:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे मुंबईचा खोळंबा.. अंधेरी घाटकोपर मेट्रो खोळंबली, रस्त्यावर झाडं कोसळल्यामुळे ट्रॅफीक जॅम, लोकल सेवा विस्कळीत, दृष्यमानता घटल्यामुळे मुंबई विमानतळाचा रन वे बंद
मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी, दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस.
कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, पालघरमधील काही भागांत गारांचा पाऊस, तर रायगडमध्ये अवकाळीमुळे आंबा बागायतदार संकटात
दुपारी ३ पर्यंत राज्यात ४२.३५ टक्के मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक ४९.९१ मतदान, तर पुण्यात सर्वात कमी ३५.६१ टक्के मतदान
तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक मतदानाच्या रांगेत, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान, १० राज्यातील ९६ जागांसाठी चुरशीची लढत