Abp Majha Impact : मुंबईत खड्ड्यांविरोधात एबीपी माझाची विशेष मोहीम, माझाच्या मोहिमेची विधानसभेत दखल

Abp Majha Impact : मुंबई आणि उपनगरात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय.... मुंबई एमएमआरडीएच्या अखत्यारित येणारे पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्ग, बीकेसी, तसंच मुंबई महापालिकेच्या अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेच खड्डे पाहायला मिळतायत... खड्डे भरण्यासाठी एमएमआरडीए आणि मुंबई महापालिकेनं प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती केलीय.. लाखोंची कंत्राटं दिली तरी देखील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतायत.. त्यामुळे  मृत्युचे सापळे ठरणाऱ्या खड्ड्यांसाठी जबाबदार कोण?  असा सवाल उपस्थित करण्यात येतोय... त्यामुळे मुंबई आणि लगतच्या उपनगरांना खड्ड्यात घालणाऱ्यांविरोधात एबीपी माझाने विशेष मोहीम हाती घेतलीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola