MHADA lottery : म्हाडाच्या सुमारे 10 हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत,सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश

Continues below advertisement

म्हाडाच्या सुमारे १० हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यातील पाच हजार, कोकण मंडळाच्या साडेचार हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या ६०० घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळांतील घरांच्या सोडतीसाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच २५ ऑगस्टपासूनच अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram