Aarey Car Shed | मेट्रो कारशेड समितीचा अहवाल सादर, आरेमध्येच काम सुरु ठेवण्याची शिफारस | ABP Majha

Continues below advertisement
 मुंबईतील मेट्रो 3 चं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच कारशेडचं काम सुरु करावं, अशी शिफारस चार सदस्यीय मेट्रो कारशेड समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.  अतिरिक्त मुख्य सचिव (अर्थ) मनोज सौनिक यांनी समितीचा अहवाल मंगळवारी (28 जानेवारी) मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला. 33.5 किमीचा कुलाबा-वांद्रे-सीप्झ अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाचं कारशेड इतरत्र हलवणं व्यवहार्य नाही. समितीला कारशेडसाठी पर्यायी जागा सापडलेली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram