Aarey car shed विरोधातील याचिका, 10 ऑगस्टला पुढील सुनावणी : ABP Majha

मुंबईतील आरे कारशेड प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आरे कारशेडचं सुरु झालेलं बांधकाम थांबवण्याची मागणी करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पर्यावरणप्रेमींकडून या प्रकरणी ७ विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत तर न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola