Aaditya Thackeray vs Sudhir Mungantiwar: आदिवासी योजनांवरुन राडा, आदित्य ठाकरे वि सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement

Maharashtra Assembly Session : विधानसभेत आदिवासी आणि कुपोषित बालकांच्या प्रश्नावरून चर्चा सुरू असताना  शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एका शब्दाने सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झाला नसल्याचे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले. या उत्तरावर विरोधाकांनी जोरदार आक्षेप घेतला. विरोधकांमधील ज्येष्ठ सदस्यांसह आदित्य ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram