Aaditya Thackeray Monsoon Session : विधान भवनात आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी, सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Monsoon Assembly Session  : "हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?" राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला (Maharashtra Monsoon Assembly Session) आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola