Aaditya Thackeray : पालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरू, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

 मुंबईतली विकासकामं आणि प्रकल्पांचं नेमकं काय झालं असा प्रश्न राज्य सरकारला विचारत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास हाच खेळ सुरू असल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेलं पाच हजार कोटींचं टेंडर का  रद्द करावं लागलं? असा प्रश्नही त्यांनी केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola