Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलं

Aaditya Thackeray On Fadanvis Meet :फडणवीसांसोबत बैठकीत काय चर्चा झाली?आदित्य ठाकरेंनी सगळं सांगितलं 
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि  मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून राज्यातील, मुंबईतील प्रश्न त्यांच्यासमोर मांडत राहणार असल्याची प्रतिक्रिया दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले.    यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती.  नागपूर हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती.    आज मुंबईत सध्या गाजत असलेला टोरेस घोटाळा याबाबतही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola