Mumbai University : मुंबई विद्यापिठात 2011 साली झालेल्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठात २०११ साली झालेल्या भरती प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रामर असा अनुभव असलेल्या
असलेल्या विनोद पाटील यांची तेव्हा उपकुलसचिवपदी कशी नियुक्ती झाली असा सवाल आता केला जातोय. विनोद पाटील आणि अन्य १७ जणांची वेगवेगळ्या पदावर अशीच नियुक्ती केली होती अशी माहिती समोर येतेय. उपकुलसचिवपदी १० वर्षे काम केल्यानंतर विनोद पाटील यांची आता जळगावमध्ये विद्यापीठात आता कुलसचिव पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे १० वर्षांनंतर आता मुंबई विद्यापीठातील भरतीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जातंय.
Continues below advertisement
Tags :
Recruitment Vinod Patil Vice Chancellor University Of Mumbai Recruitment Process Question Marks 2011 Data Entry Operator Programmer As