Amit Shah : अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यातील सुरक्षेत मोठी चूक; शाहांभोवती संशयास्पद व्यक्तीचा वावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव असल्याचे सांगत एका व्यक्ती काही तास अमित शाह यांच्याभोवती वावरत होता. या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.