Maharashtra Corona Update : राज्यात काल 40,925 कोरोनाचे रुग्ण, मुंबईत 20 हजारांवर रुग्णांची नोंद

Continues below advertisement

Mumbai Coronavirus Update : सध्या संपूर्ण जगाची धाकधुक कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं वाढवली आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच त्यातल्या त्यात देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत तर कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेली धारावीचीही चिंता वाढली आहे. सध्याचा धारावीतील दैनंदिन रुग्णांचा आकडा पाहता, मुंबईतील धारावी टेन्शन वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram