Corona India Update | कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी, एका दिवसात 10 हजार रुग्ण!
: देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. 24 तासात सर्वाधिक 396 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक 10 हजार 956 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजार 535 झाली आहे. यातील 1 लाख 47 हजार 195 बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 49.47 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 14 हजार 842 रुग्ण देशात आहेत.