Mumbai मध्ये 23 रुग्णवाहिकांचं लोकार्पण, विविध संस्थांकडून मदतीचा हात : Be Positive

मुंबईत आज विविध संस्थाकडून राज्य सरकारला 23 रुग्णवाहिका देण्यात आल्यात. या रुग्णवााहिकांचं लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. रुग्णवाहिका देणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला, माजी आमदार रवींद्र वायकर आणि नगरसेवक यशोधर फणसे यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकांचा तुटवडा जाणवला होता. हीच बाब लक्षात ठेवून या रुग्णवाहिका राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आल्या. या रुग्णवाहिका रायगड, पुणे आणि नाशिक या भागात पाठवण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola