2000 Rupees Note Exchange: 2000 रुपायांची नोटा बदलणार आहात? जाणून घ्या A टू Z माहिती ABP Majha

Continues below advertisement

2000 Rupees Note Exchange: 19 मे 2023 ची संध्याकाळ देशासाठी ऐतिहासिक ठरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) देशात पुन्हा एकदा नोटबंदी (Demonetisation) जाहीर करण्यात आली. पण यावेळी केवल 2 हजार रुपयांच्या नोटा (Rs 2000 Notes) चलनातून मागे घेण्यात आल्या. आरबीआयच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा लोकांना 2016 च्या नोटाबंदीची आठवण येऊ लागली. मात्र, यावेळी तशी परिस्थिती होताना दिसत नाही. यावेळी, नोटाबंदीमुळे बँकांबाहेर लांबच लांब रांगा दिसण्याची शक्यताच फार कमी आहे. RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी एक, दोन नाहीतर तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मे 2023 पासून म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, लोक 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलू शकतील किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram