Corona : घणसोलीतील शेतकरी विद्यालयात 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी
घणसोलीतील शेतकरी विद्यालयात 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. मागील 2 दिवसात या शाळेतील 16 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तीची नातेवाईक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला मुलगा या शाळेत शिकत होता. आज दिवसभरात महापालिकेने 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, उद्या 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी मनपा करणार आहे. 8 ते 12 मधील विद्यार्थी आहेत.