Vasai Covid Hospital Fire | ICU मधील 17 पैकी 13 रुग्णांचा मृत्यू, नॉन कोविड रुग्ण सुरक्षित : जिल्हाधिकारी
वसईतील विजय वल्लभ कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झाला. पहाटे सव्वातीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयूमधील एसीचा स्फोट झाला. आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. त्यापैकी चार रुग्ण आणि स्टाफ बाहेर आला, मात्र 13 जणांचा मृत्यू झाला तर इतर नॉनकोविड 80 रुग्ण सुरक्षित आहेत, अशी माहिती पालघरचे जिल्ह्याधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.