Sion Bridge : 112 वर्ष जुना सायन पूल पुनर्विकासाच्या कामासाठी बंद : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai News Updates: मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या लोअर परेलच्या पूलाचं (Lower Parel Bridge) काम पूर्ण झालं आणि मुंबईकरांना (Mumbai News) सुटकेचा निश्वास सोडला. नवा लोअर परेलचा (Lower Parel) पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे वाहतूक कोडींपासून दिलासा मिळाला. पण, दिलासा फार काळ टिकणार नाही, अशी चिन्ह दिसत आहे. नव्या लोअर परेल पुलाच्या बांधकामानंतर आता मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) नव्या पुलाचं बांधकाम हाती घेणार आहे. पुढच्या काही दिवसांतच सायन (Sion) - धारावी (Dharavi) - वांद्रे (Bandra) -माहिम (Mahim) या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पुल लवकरच पाडला जाणार आहे. पुलाचं पाडकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्या पुलाचं बांधकाम सुरू होणार आहे. 

मुंबईकरांना पुन्हा एकदा पुलबंदीचा सामना करावा लागणार आहे. सायन-धारावी-वांद्रे-माहिम या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा 110 वर्ष जुना पुल लवकरच पाडला जाणार आहे. रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाकरता सध्याचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला देण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा 110 वर्ष जुना सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे. 

मध्य रेल्वे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील पुलाची पुनर्बांधणी करत आहे. यासाठी सायन-धारावीचा हा पुल पाडला जाईल. मुंबई महापालिकेनं माहिमची जत्रा संपल्यानंतर म्हणजे 4 जानेवारीनंतर हा पुल बंद करण्याची परवानगी मध्य रेल्वेला दिली आहे. माहिमची जत्रा संपल्यानंतर नेमक्या कोणत्या दिवशी पूल बंद करायचा याचा निर्णय मध्य रेल्वेनं अद्याप घेतलेला नाही. 

पर्यायी मार्ग 

  • कुर्ला मार्गे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडने पूर्व द्रुतगती मार्गावरुन पश्चिम उपनगरांकडे जाता येईल 
  • सायन रुग्णालयाजवळील सुलोचना शेट्टी मार्गावरुन  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याद्वारे धारावीतील कुंभारवाड्यापर्यंत जाता येईल  
  • चुनाभट्टी-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टरद्वारे चारचाकींना बीकेसीत उतरता येईल...  मात्र त्यावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना परवानगी नाही 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram